| छायचित्र:-श्री नारायणप्रसाद कर्डिले. |
नाथ बाबांनी म्हटल्याप्रमाणे माउलिचे स्वरुप आहे. वारकरि संप्रदाय तसा अनादि आहे. परंतु विशेषत्वाने त्याला लोकाभिमुख करण्याचे महत्वाचे काम माउलिंनि केले आहे ." द्वेन्यानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।।" हा संत बहिणाबाईचा अभंग अगदि यथार्थ आहे. तसे पाहिले तर माउलि हे नाथ संप्रदायी , "पिंडे पिंडाचा ग्रासु । हा तो नाथ संकेतीचा दंशू ॥ दाउनि गेला महेशू । आद्यापी जो ॥ "हे स्वत:च माउलिनी सांगितले आहे . नाथ संप्रदायाची साधना हि एकांतात जाउन समाधि लावुन बसावे व वर्षानुवर्षे तेथेच निवांत आत्मसुखाचा अनुभव घेत राहावा.अशा परंपरेत माउलि होते. त्यांचा अभंग याची साक्ष आहे..
आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥ १ ॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासि केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रति ॥२॥
गहिनिप्रसादे निव्रुत्ति दातार । द्न्यानदेवे सार चोजविले ॥३ ॥
एवढे मोठे नाथ संप्रदायाचे वैभव पण माउलिंनी सभोवतालि पाहिले तर त्यांच्या असे लक्षात आले की तळागाळतला समाज हा अद्न्यानिच राहिला व ज्या संस्क्रुत भाषेत तत्वद्न्यान सांगितले ती भाषा बहुजन समाजाला तर येत नाहि. म्हणुन लोकभाषा मराठिमध्ये बोलल्याशिवाय लोकांना द्न्यान मिळणार नाहि आणि कळणारहि नाहि . म्हणुन ," माझा म-हाठाची बोलु कौतुके । परि अम्रुताते पैजा जिंके । ऎसि अक्षरे रसिके । मेळविन ॥" असे म्हणुन माउलिंनि द्न्यानेश्वरि लिहलि, हरिपाठ , अम्रुतानुभव, चांगदेव पासष्ठी असे ग्रंथ निर्माण केले व सर्व समाजाला शाहाणे केले.
माझे जीवीची आवाडी । पंढरपुरा नेईन गुढि ॥ असे स्वत: माउलिंनि वारिची परंपरा द्रुढ केलि व सर्व जाति-धर्माचे लोक वारित सहभागी करुन घेउन वैष्णवांचा मेळ मेळविला."मरोनिया जावे ।बा माझ्या पोटि यावे " । ऎसे करि माझ्या भावा । सख्या माझ्या द्न्यानदेवा ॥ "संत जनाबाई,
"द्न्यानराज माझी योग्याची माउलि । जेणे निगम वल्ली प्रगट केलि ॥" संत नामदेव, आणि
"द्न्यानियांचा राजा गुरु महाराव । म्हणति द्न्यानदेव ॥"संत तुकाराम या आणि अशा अनेक संतांनि माउलिवरिल आपले प्रेम प्रगट केले आहे. सर्व संतांचे लाडके आणि लडिवाळ पण गंभीर आणि दयाळु अशा माउलिंचा समाधि सोहळा कार्तिक क्रु. १४शके १९३१ दिनांक ४-१२-२०१० शनिवारिआहे. पण संपुर्ण सोहळा दि.२-१२-२०१० पासुन सुरु होत आहे.हा सोहळा श्री संत नामदेव महाराजांनी लिहुन ठेवला आहे त्यामुळे आपल्याला हे तरि माहित झाले कि त्यावेळि हा सोहळा कशा प्रकारे झाला. त्याच सोहळ्याचा थोडक्यात परामर्श श्री संत नामदेव महारांजांच्या शब्दात घेउ..........
"पंढरिचा पोहा आला अलंकापुरि । पंच कोसावरि साधुजन ॥"
पंढरिचे वारकरि आणि भक्तजन ,साधुजन श्री क्षेत्र आळंदिपासुन ५ कोसावर आले आहेत. त्या वैष्णवांच्या मांदियाळित स्वत: भगवान पांडुरंग आहेत. दिंड्या पताकांचे भार निघाले आहेत. रुषिश्वर देवाला भेटतात. सर्वजण आळंदिमध्ये आलेलेआहेत(कारण माउलि संजिवन समाधी घेणार आहेत) श्री सोपानदेवाने सर्वांना नमस्कार केला व स्वागत केले.
हरिहर आले आहेत. इंद्रायणीच्या तीरावर हरिभक्तांची गर्दि झालेलि आहे. योगियांचा सखा द्न्यानेश्वर कोठे आहे म्हणुन सर्व उत्सुक आहेत. शुन्यस्वरुपावर निरंजन गुंफ़ेमध्ये , उन्मुनि अवस्थेत माउलिंना समाधि प्राप्त झालि होती. परंतु पांडुरंगाने माउलिंना जागे केले , नामदेव महाराज म्हणाले देवा फ़ार बरे झाले माउलिंना तुम्हि जागे केले.
इंद्रायणी धन्य ,सुवर्ण पिंपळ धन्य ,भागिरथि, मनकर्णिका ,गंगा, त्रिवेणी ,रुषिश्वर , पांडरंग, अलंकापुरि सर्व संत धन्य आहेत , कारण या सर्वांना द्न्यानदेवांचा एकांत-सहवास मिळाला आहे.
कैलासाचा प्रत्यक्ष वास असणारे हे सिध्द बेट आहे , विष्णुचे वैकुंठ हेच आहे . ज्याप्रमाणे भुमीवर पंढरि त्याप्रमाणे अलंकापुरि आहे , हि पुण्यभुमी आहे.येथे निकंठाचे शिवलिंग आहे, येथे चक्रतिर्थ आहे तेथे तत्काळ मोक्ष प्राप्त होतो. नामदेव महाराज देवाल म्हणतात ,"देवा हेच स्थळ चांगले आहे कारण माउलिचे मन येथे रमले आहे.
संत देवाला विचारतात ,"देवा ! येथे पुर्वि कोणते क्षेत्र होते ?" देव म्हणतात येथेच द्न्यानदेवाला समाधि घेउ द्यायची कारण येथे पुर्वि अनादि काळापासुन सिध्दस्थान आहे , हरिला हे सांगत असतांना आनंदाश्रु आले, आळंदिला जो कोणि किर्तन करिल त्यासाठि मला यावे लागेल कारण जेथे द्न्यानदेव तेथे मी स्वत: असेल, येथे जर अस्थि विसर्जन केल्या तर त्या इंद्राणीमध्ये विरघळुन जातील आणि ब्रम्हरुप होतील, येथे मी , द्न्यानदेव अहर्निश वास्तव्यास असणार त्यामूळे द्न्यानि भक्तांना सुखाचे डोल येतील.
साडेतीन पाउले टाकिली निश्चळ । नेमियेले स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे द्न्याना होई सावधान । माग वरदान मज काही ॥२॥
द्न्यानदेव म्हणे शुध्द कार्तिक मासी । व्रत एकादसी स्वामीकड॥३॥
क्रुष्णपक्षी व्रत हरिदिनी परिपुर्ण । मागितला मान द्न्यानदेवे ॥४॥
नामा म्हणे देवा आवडिने देता । जोडेल हे संता पियुष जे ॥५॥
टाळ , म्रुदंगाचा गजर झाला, नारद, तुंबर, शुक , वामदेव, हजारो भक्तगण आलेले होते, मुंगीलाहि मार्ग मिळणार नाहि ईतकी गर्दि झालि होती. वैष्णावाचे मेळे आपार मिळाले होते कारण आता सर्वांचा आवडता द्न्यानदेव समाधि घेणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले आहेत. मनाला आवरण्याचा प्रतेकजण प्रयत्न करित आहे पण !आवरत नाहि. ज्या द्न्यानदेवाने द्न्यानेश्वरिवर टिका लिहलि तोच द्न्यानदेव आता मात्र या देहाला विटला आहे. स्वरुपाकार व्रुत्ती झाली.
दशमीला प्रदक्षिणा केलि, किर्तन सोहळा झाला, हरिजागर झाला, मग सकाळि भागीरथीचे स्नान केले, संत महंतांचे पुजन केले व सिध्देश्वराजवळ आले, त्याची पुजा केली आणि समाधीसाठी स्थळाची मागणी केली व गंगा , गिरिजा व निळकंठ यांना नमस्कार केला. श्री नामदेव महाराजाची मुले , नारा, गोंदा, महादा यांनी समाधीची जागा झाडुन स्वच्छ केलि . हरिदिनीचा जागर झाला, द्वादशीचे पारणे सुरु झाले, गंगा, गिरजा, राहि, रुक्माबाई, भामा या सर्वांनी पारण्याचा स्वयंपाक केला होता. वैष्णव , देव, संत, महंत सर्वांनी इंद्रायणीचे स्नान करुन पिंपळाचे पारावर पंक्ति बसविल्या स्वत: भगवान पांडुरंग पात्रे वाढित होते. हे द्रुश्य पाहुन नामदेव महाराजांना गहिवरुन आले, हरि हा सोवळ्यामध्ये वाढित आहे, त्याचा मनीचा कळवळा कोणाला कळणार आहे? हरिने रुक्मिणीचे कानात सांगितले कि द्न्यानदेवाचे ताटात भरपुर वाढ , राहि, रुक्मिणीनी भरपुर वाढले, द्न्यानदेवाने पारणे सोडले. दुपारपर्यंत जेवणे झाली, तिस-या प्रहरि किर्तन झाले, नामदेव महाराज देवाला म्हणाले, देवा ! आता उशिर होता कामा नये कारण या भौतिक जगतातुन माउलिंचे मन केव्हाच निघुन गेले आहे, ते आता विकळ होऊ पहात आहे. अष्टोत्तरशे वेळा येथेच समाधि पुर्वी घेतलि होती. त्याच ठिकाणी सिध्देश्वराजवळ ढवळा नंदि उठवीला विवरावरची शिळा काढली, आसन , धुनी , म्रुगाजिन , लावलेले होते. खरे तर चिद्रत्न हेच आसन आहे, उन्मुनीची धुनि आहे धुवट वस्त्राची घडी अंथरलि , दुर्वा, दर्भ, अंथरले त्यावर फ़ुले टाकली .
माउलि द्न्यानोबाराय त्या आसनावर आसनस्थ झाले, तरति शोकात्मवित॥ या न्यायाने माउलिंनी पद्मासन घातले, आणि..द्न्यानदेवाचे गुरु,(खरे तर ते त्यांचे थोरले भाउ पण होते पण माउलिंनी हे बौतिक नाते कधि आड येउ दिले नाही ) निव्रुत्तीनाथ तेथे आले आणि शोकविव्हल झाले त्यांना काय वाटले हे त्यांच्याच शब्दात पाहा.........
वोसंडोनी निव्रुत्ती आलिंगो लागला । आणिकांच्या डोळा अश्रु येती ॥१॥
अमर्यादा कधि केली नाहि येणे । शिष्य गुरुपण सिध्दि नेले ॥२॥
काढोनिया गुह्य वेद केले फ़ोल । आठवती बोल मनामाजी ॥३॥
नामा म्हणे संत कासाविस सारे । लाविती पदर डोळियासी ॥४।\
निव्रत्तिनाथांनी सर्व भावंडाची समाधी स्थाने सांगितली नतर त्यांना शोक आवरेना ते म्हणतात ज्याप्रमाणे तळ्याचा बांध फ़ुटावा आणि पाणि सैरावैरा धावते , बांधल्या पेंढिचा आळा सुटल्यावर त्यातील गवत जसे पांगले जाते , पाडसाची हरणी गेल्यावर जसे पाडस दशदिशाला धावत सुटते त्याप्रमाणे आम्हाला झाले आहे. आई-वडील गेले तेव्हा एवढे दु:ख झाले नव्हते एवढे द्न्यानदेव समाधि घेत असतांना होत आहे. हा शोकाग्नि वाढला नामदेव महाराज देवाल म्हणतात "देवा! तुम्हिच आता निव्रुत्तिचे समाधान करा ." देवांनी निव्रुत्तीनाथांची समजुत काढली. विठा नारा, महादा, गोंदा, जागो जाग उभे राहिले आहेत, विसोबा खेचर, चांगा वटेश्वर , या सर्वांनी माउलींना नमस्कार केला.गोरा कुंभार, सावता माळी, नामदेव तळमळ करित होते. सर्व वैष्णवांनी माउलिला वंदन केले, नामदेव महाराज म्हणतात ,"देवा ! ज्याप्रमाणे घार उडुन गेल्यावर तीच्या पिलाची दाणादाण होते त्याप्रमाणे झाले आहे.
निव्रुत्ति आणि स्वत: देवाने माउलिंचे दोन्हि हात धरुन प्रत्यक्ष समाधी स्थळाकडे नेले समाधिच्या आसनावर द्न्यानेश्वर बसले, समोर द्न्यानेश्वरि ठेवली , माउलींनि तीन वेळा आपले हात जोडले, डोळे झाकले, भीममुद्रा साधिली, द्न्यानदेव पुर्ण-ब्रम्ह झाले," नामा म्हणे आता लोपला दिनकर।बाप द्न्यानेश्वर समाधिस्थ ॥" तदनंतर निव्रुत्तीनाथांनी सर्वाना समाधिस्थळापासुन बाहेर आणले....
निव्रुत्तीने बाहेर आणिले गोपाळा । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरिरा । म्हणती धरा धरा निव्रुत्तीसी ॥२॥
आणिकांची तेथे उद्विग्न ती मने। घालिताती सुमने समाधीसी ॥३॥
नामदेवे भावे केली असे पुजा । बापा द्न्यानराजा पुण्यपुरुषा ॥४॥
त्यानंतर सर्वांनाच शोक अनावर झाला सगळिकडे अश्रुपात होत होते " आता ऎसे होणे नाही ।" द्न्यानदेवाची हातवटी कोणाला येणार नाही , माउलिच्या कळवळ्याला आपण अंतरलो आहोत. निव्रुतीनाथांनी मौन धरले, सर्व भाविकांनी वारक-यांनी द्न्यानेश्वर माउलींचा जयघोष केला व आळंदिची यात्रा संपली , देव नामदेवासह पंढरीला गेले व सर्व स्वस्थळी प्रस्थान करते झाले.